Monday, February 18, 2008

सौदामिनी

आधीच धुमसत होते अंतर, त्यातच ठिणगी पडली जशी;
सुरुंग उडला जसा निघाला सहा शिपायांनिशी. -१

राव इरेचा असा, पेटता डोंबच त्याच्या मनी,
कडकडत्या खडगात नाचती तृषर्त सौदामिनी. -२

सुर्यरथाचे अश्व निखळले आले पृथ्वीवरी,
चौखुर उधळत धरणी विंधीत गेले वार्‍यावरी. -३

शिवतेजाच्या प्रखर शलाका सरसरल्या सत्वरी,
काळोखाच्या छाताडावर थै थै नर्तन करी. -४

सात सतींचे पुण्य आणखी सप्तर्षींचा धीर,
वीर न वेडे पीर निघाले सात शीवाचे तीर. -५

- श्री.शिरीष गोपाळ देशपांडे.

No comments: